नगरसेवक शरदभाऊ फडोळ यांना मंत्री जयकुमार रावल यांची सदिच्छा भेट!

नाशिक (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टीचे विपणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी नाशिक येथे नगरसेवक शरदभाऊ फडोळ यांची सदिच्छा भेट घेत त्यांच्या सामाजिक व लोकाभिमुख कार्याचे कौतुक केले. यावेळी मंत्री रावल यांनी फडोळ यांच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती घेत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान परिसरातील नागरिकांशीही त्यांनी संवाद साधत स्थानिक पातळीवर राबविण्यात येणाऱ्या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती घेतली. नगरसेवक शरदभाऊ फडोळ यांनी आपल्या प्रभागात राबविलेल्या विविध विकासकामांबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. या कार्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास आणि आपुलकी निर्माण झाल्याचे मंत्री रावल यांनी नमूद केले.
याप्रसंगी नगरसेवक शरदभाऊ फडोळ व त्यांचे बंधू गव्यसिद्ध मधुकर फडोळ यांनी मंत्री जयकुमार रावल यांचा सत्कार केला. यावेळी फडोळ बंधुनी उभारलेल्या गोशाळेला मंत्री जयकुमार रावल यांनी भेट देत संपूर्ण गोशाळेची पाहणी केली, गोशाळेतील जनावरांच्या निवाऱ्याची व्यवस्था, स्वच्छता, चारा व पाण्याची उपलब्धता, तसेच जनावरांच्या आरोग्याची काळजी कशी घेतली जाते याची त्यांनी सविस्तर माहिती घेतली. गोशाळेत करण्यात येणारी गोरक्षणाची सेवा, जनावरांची निगा व व्यवस्थापन पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. फडोळ बंधूंच्या या उपक्रमातून समाजसेवेची भावना, नागरिकांप्रती असलेली आपुलकी आणि संवेदनशीलता स्पष्टपणे दिसून येते, असे मत मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केले. समाजासाठी काम करताना अशा प्रकारच्या सेवाभावी उपक्रमांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच अशा उपक्रमांमुळे समाजात सेवाभाव आणि सकारात्मक संदेश पोहोचतो. समाजातील प्रत्येक घटकाने समाजसेवेसाठी पुढाकार घेतल्यास अनेक सामाजिक प्रश्न सुटू शकतात, असेही मंत्री रावल यांनी यावेळी सांगितले. भविष्यातही फडोळ बंधूंच्या हातून समाजाची अशीच मनोभावे सेवा घडत राहो आणि अशा उपक्रमांमुळे समाजात प्रेरणा निर्माण होवो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या भेटीदरम्यान मंत्री जयकुमार रावल यांचा नगरसेवक शरदभाऊ फडोळ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी स्थानिक नागरिकांनीही मोठ्या उत्साहात उपस्थिती लावली होती.
या कार्यक्रमाला नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, नगरसेविका प्रतिभा पवार तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही फडोळ बंधूंच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत अशा सेवाभावी कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडू शकतो, असे मत व्यक्त केले. या सदिच्छा भेटीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक उपक्रमांना नवे बळ मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. तसेच भविष्यातही अशाच समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेसाठी काम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *