.–II ● विवेक विचार ● II– सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३६२ वा दिवस

.–II विवेक विचार ● II–

सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३६२ वा दिवस

          आपल्या राष्ट्राची नौका शतकानुशतके प्रवास करीत आहे. आपल्या अमोल संस्कृतीचे देणे देऊन जगाला समृद्ध करीत आहे. जीवन सागरापासून या राष्ट्रीय नौकेने आजवर अनेक शतके वाटचाल केली आहे आणि लक्षावधी जीवांना सर्व दुःखे ओलांडून पैलतीरावर पोहचविले आहे. आज त्या नौकेला छिद्र पडले आहे. ती छिन्न झाली आहे. हे आपल्या चुकीने घडले की अन्य कोणाच्या हे तितके महत्त्वाचे नाही. आज आपण सारे या नौकेत आहोत. अशावेळी आपण काय करायचे? एकमेकांना दोष द्यायचा? परस्परांशी भांडायचे? आपण आपली सर्वांची शक्ती एकत्र करायची नाही का? याचा आपण गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.

                             स्वामी विवेकानंद…       

*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*

*★ भारतीय सौर श्रावण २४ शके १९४८*

★ श्रावण शुध्द /शुक्ल ३

★ शालिवाहन शके १९४८

★ शिवशक ३५१

★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७

★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३

★ शनिवार दि. १५ ऑगस्ट २०२६

★ अश्वत्थ मारुती पूजन

★ फरवरर्दीन पारसी नववर्ष १३९६ प्रारंभ

★ १७६९ असामान्य सेनापती, कुशल प्रशासक, फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बानापार्ट यांचा जन्मदिन.

★ १८७२ क्रांतिकारक, महान तत्वज्ञ, योगी अरविंद घोष यांचा जन्मदिन.

★ १९४७ भारत ब्रिटिश राजवटीतून पूर्णपणे स्वातंत्र्य झाला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पदाची सूत्रे हाती घेतली.

मरुता शाम्पमानं उच्चैर्विराजमानम् ।

रुचिरं त्रिवर्णकान्तं राष्ट्रध्वजं नमामि ||

तेजस्वी अशा तीन रंगानी शोभून दिसणाऱ्या खूप उंचावर वाऱ्याच्या वेगामुळे फडफडणाऱ्या राष्ट्रध्वजाला मी वंदन करतो. ८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायु राहो.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *