नाशिकमध्ये ‘अहिल्या रत्न पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन; श्रीरामलीला एज्युकेशन सोसायटीचा पुढाकार

नाशिक : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून शहरातील श्रीरामलीला एज्युकेशन सोसायटीच्या वतीने विशेष ‘अहिल्या रत्न पुरस्कार’ सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाजासाठी निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या आणि विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांच्या कार्याचा सन्मान या उपक्रमातून केला जाणार आहे.

समाजातील उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक, प्रतिष्ठित उद्योगपती, जनसेवक आणि सेवाभावी संस्था यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा या पुरस्काराद्वारे गौरव करण्यात येणार आहे. समाजात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या अशा नायकांना आणि संस्थांना समाजासमोर आणण्याचा आयोजकांचा मुख्य उद्देश आहे.

या मानाच्या पुरस्कारासाठी पात्र असलेल्या किंवा इच्छुक व्यक्ती आणि संस्थांनी आपली माहिती तसेच आपल्या कार्याचा संक्षिप्त परिचय आयोजकांकडे सादर करायचा आहे. या भव्य सोहळ्याची तारीख आणि स्थळ संयोजकांकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

तरी, समाजहितासाठी कार्य करणाऱ्या अधिकाधिक पात्र व्यक्ती व संस्थांनी या सन्मानासाठी संपर्क साधावा, असे आवाहन श्रीरामलीला एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व प्रस्ताव पाठवण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुणाताई दरगुडे (९४०३२३४७४१), उपाध्यक्षा सौ. शिल्पाताई झारेकर (७७७५८९३१८६) आणि सचिव श्री. रंगनाथ दरगुडे (७३८५८६४६४१) यांच्याशी संपर्क साधण्याचे सुचविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *