महिला-बालकल्याण, शहर सुधारणा, वैद्यकीय व साहाय्य, विधी आणि शिक्षण समित्यांसाठी सदस्य निश्चित
नाशिक, प्रतिनिधी : महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत महापालिकेच्या विविध समित्यांवर सदस्यांची निवड करण्यात आली आहे. महिला व बाल कल्याण समिती, शहर सुधारणा समिती, वैद्यकीय व साहाय्य समिती, विधी समिती तसेच शिक्षण समितीवर सदस्यांची निवड करण्यात आली असून, प्रत्येक समितीत महत्त्वाच्या विषयांवर कामकाज केले जाणार आहे.
महापालिकेच्या विविध कायदेशीर बाबी, ठराव, नियम व प्रशासकीय निर्णयांशी संबंधित विषयांवर काम करणाऱ्या विधी समितीवर जुई शिंदे, अंकिता शिंदे, विश्वास नागरे, राजू आहेर, भूषण राणे, कविता नाईक, आशा तडवी, संजीवनी हंडोरे आणि मुकेश सहाणे यांची निवड करण्यात आली आहे. महापालिकेच्या विविध धोरणात्मक व कायदेशीर विषयांवर या समितीमार्फत विचारविनिमय केला जाणार असून, समितीच्या निर्णयांना प्रशासनाच्या कामकाजात विशेष महत्त्व असणार आहे.
शिक्षण समितीवर- छाया देवांग, सोनाली भांडूरे, सचिन मराठे, शरद मोरे, शरद फडोळ, नयना जाधव, कैलास मुदलीयर, सीमा पवार आणि किरण राजवाडे यांचा समावेश आहे.
महिला व बाल कल्याण समितीवर – चित्रा तांदळे, भारती धिवरे, स्वाती भामरे, कोमल मेहेरोलिया, रुपाली निकुळे, ज्योती जोंधळे, इंदुमती नागरे, प्रमिला मैद आणि सीमा ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे.
शहर सुधारणा समितीवर – रुपाली ननावरे, उषा बेंडकोळी, श्वेता भंडारी, जयंत जाचक, संध्या कुलकर्णी, प्रवीण जाधव, प्रमोद पालवे, योगेश भोर आणि जागृती गांगुर्डे यांचा समावेश करण्यात आला आहे.
वैद्यकीय व साहाय्य समितीवर – वाळू काकड, सविता काळे, राहुल शेलार, साधना मटाले, सतीश निकम, डॉ. पूनम महाले, नितीन दातीर आणि वैशाली दळवी यांची निवड झाली आहे.
विधी समितीवर – जुई शिंदे, अंकिता शिंदे, विश्वास नागरे, राजू आहेर, भूषण राणे, कविता नाईक, आशा तडवी, संजीवनी हंडोरे आणि मुकेश सहाणे यांची निवड करण्यात आली आहे.
या समितीमध्ये प्रभाग क्रमांक २८ चे नगरसेवक शरदभाऊ हरीभाऊ फडोळ यांचा समावेश झाल्याने त्यांच्या समर्थक व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न, महापालिकेच्या शाळांचा विकास, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या दृष्टीने शिक्षण समितीचे काम महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे या समितीवर निवड झाल्यानंतर शरदभाऊ फडोळ यांच्याकडून प्रभागासह शहरातील शिक्षणविषयक प्रश्नांबाबत प्रभावी भूमिका मांडली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
