The post शपथविधी मुहूर्त ठरला! कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? पहा सविस्तर..! first appeared on नाशिक बातमी.

जाहिरात
जाहिरात

The post शपथविधी मुहूर्त ठरला! कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? पहा सविस्तर..! first appeared on नाशिक बातमी.

The post नाशिक शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी मनसेचे थेट राज्यपालाना साकडे first appeared on नाशिक बातमी.

The post नाशिक शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी मनसेचे थेट राज्यपालाना साकडे first appeared on नाशिक बातमी.

The post भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पक्षाच्या निर्णयावर दर्शवली नाराजी! first appeared on नाशिक बातमी.

]]>भाजपने मंगळवारी किरीट सोमय्या यांची विधानसभा निवडणूक संपर्कप्रमुखपदी नियकु्ती केली होती. पण सोमय्या यांनी एका पत्राद्वारे हे पद नाकारले. भाजपचे काम करण्यासाठी मला कोणत्याही पदाची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी १८ फेब्रुवारी २०१९ मध्ये मला पत्रकार परिषदेतून जाण्यास सांगितले तेव्हापासून आजपर्यंत मी पक्षाचे जीव लावून काम करत आहे. आपण सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे पक्षाचं काम करत राहणार. माझा निर्णय मी प्रदेशाध्यक्षांना कळवला असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे सोमय्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु झाली आहे.

The post भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पक्षाच्या निर्णयावर दर्शवली नाराजी! first appeared on नाशिक बातमी.

The post दि. नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेच्या सल्लागारपदी सुनील घुगे first appeared on नाशिक बातमी.

The post दि. नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेच्या सल्लागारपदी सुनील घुगे first appeared on नाशिक बातमी.

The post शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत किशोर दराडे विजयी first appeared on नाशिक बातमी.

]]>नाशिक: प्रतिनिधी :/ नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी दि.1अंबड वेअर हाऊस येथे मतमोजणीला दुपारी सुरवात झाली. पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेल्या दराडे यांनी आपली आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवली आणि विधानपरिषद निवडणुकीत नाशिक शिक्षक मतदार संघात महायुतीचे किशोर दराडे यांनीच बाजी मारत आमदारकी कायम राखली.
अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे दुसऱ्या क्रमांकावर तर ठाकरे गटाचे उमेदवार अॅड. संदिप गुळवे तिसर्या क्रमाकांवर गेल्याने ठाकरे गटासाठी हा धक्का आहे. विजयी कोटा 31 हजार 576 ठरवण्यात आला होता. दरम्यान मतमोजणीत विजयाची मते कोणत्याही उमेदवाराला नसल्याने दुसऱ्या पसंतीची मते मोजली. त्यावर उमेदवाराचा विजय निश्चित करण्यात आला.
नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये एकूण मतदान 64 हजार 853 झाली त्यापैकी 1 हजार 702 मते अवैध ठरली तर 63 हजार 151 मते वैध धरण्यात आली. राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघ मतमोजणीत प्रथम मोजण्यात आलेल्या साठ हजार मतांमध्ये महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार आ दराडे यांनी ठाकरे गटाचे गुळवे व अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना दणका देत पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली. सोमवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. दुपारी चार वाजेपर्यंत सर्व मतदान पत्रिकांची रसमिसळ करणे, त्यांचे गठ्ठे तयार करणे, प्रत्येक टेबलावर हजार मत पत्रिकांचे गठ्ठे मोजणीला देण्यात आले. मतमोजणीवेळी अवैध मतपत्रिका बाद करण्यात आल्या. सायंकाळी पाच नंतर मतमोजणीला सुरुवात झाली. साठ हजार मतमोजणीत दराडे यांनी पहिल्या फेरीत सर्वाधिक मते घेतली. विजयापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवाराला 31 हजार मतांचा कोटा पूर्ण करणे शक्य न झाल्याने दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात आली. त्यात दराडे हे विजयी घोषित करण्यात आले. किशोर दराडे यांच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेळावा घेऊन ही जागा प्रतिष्ठाची केली होती. उमेदवारांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

The post शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत किशोर दराडे विजयी first appeared on नाशिक बातमी.

The post पीक विम्याची रक्कम मिळवुन द्यावी यासाठी कॉग्रेसचे इगतपुरीच्या तहसीलदारांना निवेदन first appeared on नाशिक बातमी.

]]>इगतपुरी तालुक्यात गेल्या वर्षी अवकाळी पावसाने धूमाकुळ घातला होता यावेळी भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवुन शेतकरी हवालदील झाला होता परंतु पीक विमा भरलेला असल्याने एक आशेचा किरण शेतकर्यांसमोर होता याप्रसंगी विमा कंपनीचे अधिकारी प्रत्यक्षात बांधावर जावुन खात्री करून गेले मात्र अजुन एक छदामही शेतकर्यांना मिळाला नाही
यामुळे कॉग्रेसचे प्रदेश सचिव भास्करराव गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीचे नायब तहसीलदार श्री गेंडाळे यांना निवेदन देण्यात आले इतर तालुक्यात हि रक्कम वितरीत झाली असुन इगतपुरीवर अन्याय का? म्हणून लवकरात लवकर विमा रक्कम मिळवुन न दिल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला याठीकाणी कॉग्रेसचे मा तालुकाध्यक्ष रामदास पा धांडे,जेष्ठ नेते बाळासाहेब वालझाड़े,जेष्ठ नेते निवृत्ती पा कातोरे,जेष्ठ नेते दशरथ पा मालूंजकर,ता उपाध्यक्ष बाळासाहेब लंगड़े,युवक कॉग्रेसचे योगेश सुरूडे,चंदू शेठ किर्वे, सुदाम भोसले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

The post पीक विम्याची रक्कम मिळवुन द्यावी यासाठी कॉग्रेसचे इगतपुरीच्या तहसीलदारांना निवेदन first appeared on नाशिक बातमी.

The post सटाणा आगाराला मिळाव्यात अत्याधुनिक ४० बसेस अन्यथा १५ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण छेडणार : बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांचा इशारा first appeared on नाशिक बातमी.

]]>१५ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण छेडणार : बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांचा इशारा
सटाणा : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असले तरी सटाणा आगारातील नादुरुस्त बसेसमुळे सध्या सर्वसामान्य प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. बसस्थानकातून प्रवासाला निघताच ऐन रस्त्यात बसेस बंद पडत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे. सटाणा आगारासाठी नवीन बसेस द्याव्या अशी मागणी राज्याचे परिवहन मंत्री व पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली होती. मात्र अजूनही शासनाकडून या मागणीला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये संतप्त भावना आहे. सटाणा आगारासाठी तातडीने ४० नवीन बसेस मिळाल्या नाही तर येत्या १५ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण छेडणार असल्याचा संतप्त इशारा बागलाणच्या माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी दिला आहे.
यासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार सौ.चव्हाण म्हणाल्या, सटाणा आगारातील नादुरुस्त बसेसमुळे सध्या सर्वसामान्य प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. या बसेस रस्त्यात कधीही बंद पडत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. महाराष्ट्र व गुजरात राज्याला जोडणार्या या आगारातून दररोज हजारो प्रवासी एसटी बसने प्रवास करतात. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी चांगल्या दर्जाच्या सुस्थितीतील बसेस असणे आवश्यक आहे. परंतु नादुरुस्त बसेसमुळे सर्वसामान्य प्रवाशांना नाईलाजास्तव जीवघेण्या व महागड्या खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो.
सटाणा आगाराला सटाणा आणि देवळा या दोन तालुक्यांसाठी सेवा द्यावी लागते. एसटी बसेसची धावण्याची मर्यादा दहा वर्षे व दहा लाख किलोमीटर असताना सटाणा आगारातील एकूण ७१ बसेस मात्र सध्या १५ लाखांहून अधिक किलोमीटर अंतर धावलेल्या आहेत. या सर्व बसेसचे वयोमान १५ वर्षे पूर्ण झाल्याने त्या कालबाह्य झाल्या आहेत. मात्र तरीही सर्व फेर्या याच जुन्या बसेसद्वारा होत असल्याने प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. या बसेसचे ब्रेकडाऊन होण्याचे प्रमाण वाढले आहे. स्टिअरिंग ऑइल नाही, गिअर पडत नाही. रेडीएटरमध्ये पाणी नाही. टायर्सची दुरावस्था, स्टार्टर खराब झाल्यामुळे धक्का मारण्याची वेळ येणे, फॅन बेल्ट नसल्याने मशीन गरम होणे या बाबी नेहमीच्याच झाल्या आहेत.
यामुळे नवीन बस नसल्याने लांब पल्ल्यासाठीही जुन्याच बस वापराव्या लागत आहेत. या बसेस दररोज धावत असल्याने त्या रस्त्यात कधीही-कुठेही बंद पडतात आणि त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करत भर उन्हात रस्त्याच्या कडेला ताटकळत उभे राहावे लागते. याचा मोठा त्रास विशेषत: वृद्ध, लहान मुले आणि महिला प्रवाशांना होतो. या प्रकारामुळे प्रवासी वर्गात संताप व्यक्त केला जात असून प्रवासी नाइलाजाने खासगी वाहतुकीकडे वळले आहेत. त्यामुळे आगाराच्या उत्पन्नावरही याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे तातडीने सटाणा आगाराला ४० बसेस मिळाव्यात.
सटाणा आगाराच्या बसेस रात्री-अपरात्री निर्जनस्थळी बंद पडत असल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत असून यामुळे कोणतीही जीवित असा वित्तहानी होऊ शकते. परिवहन मंत्र्यांकडे सातत्याने मागणी करूनही नवीन बसेस मिळत नसल्याने शासन जनतेविषयी किती उदासीन आहे, हे दिसून येते.
-दीपिका चव्हाण, माजी आमदार

The post सटाणा आगाराला मिळाव्यात अत्याधुनिक ४० बसेस अन्यथा १५ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण छेडणार : बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांचा इशारा first appeared on नाशिक बातमी.

The post HD hdhs hehe first appeared on नाशिक बातमी.

The post HD hdhs hehe first appeared on नाशिक बातमी.

The post नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले मंत्रिमडळ जाहीर; कुणाला कुठलं खातं? first appeared on नाशिक बातमी.

]]>मंत्रिमंडळात कुणाला कोणतं मंत्रालय?
अमित शाह- गृहमंत्रालय,
राजनाथ सिंह- संरक्षण मंत्रालय
एस जयशंकर – परराष्ट्र
नितीन गडकरी- रस्ते आणि वाहतूक
निर्मला सीतारमन – अर्थमंत्रालय
शिवराज सिंह चौहान- कृषी मंत्रालय
जीतन राम मांझी – सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय,
पियुष गोयल -वाणिज्य
अन्नपूर्णा देवी- महिला आणि बाल विकास मंत्रालय
भूपेंदर यादव – पर्यावरण
राम मोहन नायडू- नागरी उड्डाण मंत्रालय
जेपी नड्डा- आरोग्य मंत्रालय
सर्वानंद सोनोवाल – पोर्ट शिपिंग मंत्रालय
सी आर पाटील- जलशक्ती
किरण रिजीजू- संसदीय कार्यमंत्री
धर्मेंद्र प्रधान- शिक्षण मंत्री
अर्जुनराम मेघवाल- कायदा मंत्री
चिराग पासवान – क्रीडा मंत्री अन्न प्रक्रिया मंत्री
प्रल्हाद जोशी – ग्राहक कल्याण मंत्रालय
गिरिराज सिंह – टेक्सटाइल मंत्रालय
ज्योतिरादित्य सिंधिया- सूचना आणि प्रसारण मंत्री
मनसुख मंडाविया- कामगार मंत्री
हरदीप सिंह पुरी- पेट्रोलियम मंत्री
एचडी कुमारस्वामी – अवजड उद्योग मंत्री.

The post नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले मंत्रिमडळ जाहीर; कुणाला कुठलं खातं? first appeared on नाशिक बातमी.

The post प्रतिक्षा : कोण होणार नाशिकचे खासदार! first appeared on नाशिक बातमी.

]]>नाशिक (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता अवघे २४ तास उरल्याने उमेदवार अन् कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली असून, सर्वसामान्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का काहीसा वाढल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनीही विजयाचा दावा केला आहे. दिंडोरी लोकसभेसाठी एक ईव्हीएम असल्याने एकूण २६ फेºया होणार असून, नाशिकसाठी दोन ईव्हीएम असल्यामुळे दुप्पट वेळ लागणार आहे. नाशिककरिता एकूण ३० फेºया होतील. दिंडोरीचा निकाल दुपारी १२ वाजेपर्यंत, तर नाशिकचा दुपारी ४ वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.
नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी गेल्या पाच वर्षांत मतदारांची संख्या वाढल्याने मतदानाचा टक्काही वाढला. त्यामुळे एकूण मतदारांचे प्रमाण कमी दिसत असले, तरी २०१९ च्या तुलनेत जास्त मतदान झाल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. मतदान झाल्यानंतर आता उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींकडून आकडेमोड करून विजयाची राजकीय समीकरणे मांडली जात आहेत. विद्यमान खा. हेमंत गोडसे हे विजयी झाल्यास त्यांच्या नावे विक्रम नोंदविला जाईल, तर वाजे यांनी बाजी मारल्यास ते जायंट किलर ठरतील. यामुळेच नाशिकबाबत सर्वांचेच लक्ष लागून आहे. २० मेपासून अनेक राजकीय तर्क-वितर्क व्यक्त करत विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. आता सर्वांचे लक्ष निकालावर केंद्रीत झाले आहे. अंबड एमआयडीसीतील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. ४ जूनला सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल. प्रथमत: पोस्टल मतदारांनी केलेल्या मतदानाची मोजणी होईल. यानंतर ईव्हीएममध्ये बंदिस्त मतमोजणीस प्रारंभ होईल. त्यासाठी प्रत्येक विधानसभानिहाय १४ टेबल असणार आहेत. प्रत्येक टेबलवर उमेदवारांचा एक प्रतिनिधी असेल. याप्रमाणे प्रत्येक उमेदवाराला सहा विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण ८४ प्रतिनिधी नियुक्त करावे लागतील. उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिका-यांना नियुक्तीचे पत्र देणे बंधनकारक असेल, तसेच उमेदवार प्रतिनिधींचे फोटो देणे आवश्यक आहे.
दरम्यान, गेल्या लोकसभेचा निकाल २३ मे २०१९ रोजी जाहीर झाला होता. उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू राहिल्यामुळे उमेदवारांना मध्यरात्री प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळीदेखील तेवढाच विलंब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

The post प्रतिक्षा : कोण होणार नाशिकचे खासदार! first appeared on नाशिक बातमी.