शपथविधी मुहूर्त ठरला! कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? पहा सविस्तर..!
महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक पार पडलेली असून संपूर्ण निकाल काल रात्री 08:00 पर्यंत स्पष्ट झालेले आहेत. महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या निवडणुकीत कोण जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. या विधानसभा निवडणुकीत महायुतीने तब्बल 235 पेक्षा अधिक जागा जिंकलेल्या आहेत. हाती आलेल्या निकालांनुसार 288 पैकी 236 जागांवर महायुती आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीला फक्त 49 जागांवर आघाडी मिळालेली आहे. यामध्ये महायुतीच्या भाजपाला 137 शिवसेनेला (शिंदे गट) 58, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) 41 जागा मिळाल्या आहे. तर महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) 20, काँग्रेसला 15 व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 14 जागा जिंकलेल्या आहे.
महायुतीतील नेत्यांनी तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेचे विशेष आभार मानले आहे. तसेच येत्या 24 तासात नवीन सरकार स्थापन केले जाणार आहे असेही सांगितले. 26 तारखेपर्यंत शपथविधी देखील पार पडणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे.
जाहिरात
जाहिरात